संचारबंदी आदेशाचे उल्लंघन ; जळगावात सात जणांवर गुन्हे दाखल

0

खबरदार…विनाकारण शहरात फिरत असाल तर होणार गुन्हा दाखल

जळगाव – खबरदार जर तुम्ही विनाकारण शहरात फिरत असाल तर गुन्हा दाखल होऊ शकतो. अशाच प्रकारे कोरुनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागु असलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यां सात जणांवर शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत . त्यामुळे घरातच रहा आणि स्वतःचा कोरोनापासुन तसेच कारवाई तसेच गुन्हा दाखल होण्यापासुन बचाव करा, असे आवाहन करण्यात येत आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा या उद्देशाने राज्यासह देशात २१ दिवसांकरीता संचारबंदी लागु करण्यात आली आहे. शहरात अत्यावश्यक सेवा सोडून इतरांना शहरात फिरण्यास बंदी आहे. यानुसार कारवाईसाठी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी पोउनि विशाल सोनवणे, स.फौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, पो.ना. नितीन पाटील, पो.कॉ. प्रविण मांडोळे, सचिन पाटील, योगेश बारी, हेमंत कळसकर, असिम तडवी, मुदस्स काझी, इम्रान अली सैय्यद, लुकमान तडवी यांचे पथक नियुक्त करुन सुचना तसेच आदेश दिले होते.

त्यानुसार पथकाने एमआयडीसी हद्दीत संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संशयित आरोपी मयूर दगडू सोनवणे (वय-२१) रा. सुप्रिम कॉलनी, बाळू सिताराम धनगर (वय-५२) रा. सुप्रिम कॉलनी, दगडू पंढरीनाथ घुगे (वय-५०) रा. जोशीवाडा, मेहरूण, प्रमोद सुपडू घुगे (वय-४७) रा. सुप्रिम कॉलनी, जितेंद्र अण्णा टिळंगे (वय-२४) रा. जाखनी नगर, कंजरवाडा, उमेश पंढरीनाथ अहिरे (वय-२१) रा. पंचमुखी हुनमान मंदीराजवळ, लाठी शाळेजवळ, ईश्वर बहारूमल मेथनी (वय-५४) रा. कंवरनगर, सिंधी कॉलनी यांच्यावर कारवाई केली. पोहेकॉ मुद्दस्सर काझी यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात जमावबंदी आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.