संचारबंदी मुळे खेळणी व्यावसायिकांचे हाल

नक्कीच येईल उपासमारीची वेळ,महिनाभरात 15 लाखाचे नुकसान

जळगाव – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाने राज्यात 30 एप्रिल पर्यंत संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यासंचार बंदीमुळे कोरोना जाईल कि नाही माहित नाही मात्र यामुळे खेळणी व्यवसायीकांवर नक्कीच उपासमारीची वेळ येईल असे मत शहरातील खेळणी व्यावासायिक विचारात आहेत.गत वर्षीपासून कोरोनाची टांगती तलवार डोक्यावर आहे. आत्ता कुठ तरी व्यवसाय पुन्हा पूर्व पदावर येतो कि काय असा वाटत असतानाच लावण्यात आलेल्या या संचार बंदीचा सर्वच व्यावसायिकांकडून निषेध केला जात आहे. गेल्या महिनाभरात शहरातील खेळणी व्यावयीकांचे 15 लाखाचे नुकसान झाल्याचेही यावेळी व्यावसायिकांनी सांगितले.

खेळणी घेण्यसाठी काही गर्दी झाली आहे का ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी होईल अशा ठिकाण बंद केले जातील असे म्हटले होते. ज्या मंदिर सार्वजनिक ठिकाण या सर्व ठिकाणांचा समावेश होतो. अशा वेळेस नागरिकांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र खेळण्यांच्या दुकानात आजपर्यंत कधी कोणी गर्दी पाहिली आहे का? जिथे कधी गर्दी होताच नाही अश्या ठिकाणं बंद करून राज्यशासनाला काय मिळाले असा प्रश्न खेळणी व्यवसायिक विचारत आहेत.

गेल्या महिनाभरात 15 लाखाचे नुकसान
महाराष्ट्र शासनाने तरी आत्ता टाळेबंदी घोषित केली असली तरी जिल्हात या आधी 2 वेळी जनता कर्फिव लावण्यात आला होता. खेळण्यांचा व्यवसाय हा दिवसांवर चालतो आज माल विकला गेला तरच उद्या पैसे मिळतात. अश्या या उद्भवलेल्या भयानक परीसस्थितीमुळे एकट्या शहराचे 15 लाखाचे नुकसान झाले आहे. बाकी जिल्हा आणि राज्याचा विचार करायलाच नको.

खेळणीही पार्सल स्वरुपात विकू शकतो
अत्यावश्यक सेवा सोडून राज्यात काहीही मिळणार नाही असे खुद्द मुख्यमंत्री म्हणाले होते. दारू ही अत्यावश्यक सेवा कशी? म्हणजे जर दारुमुळे सरकारला पैसा मिळत असेल तर सरकार फक्त स्वतःचाच विचार का करत आहे ?शहरात खाद्यपदार्थ विक्रेते चालतात. त्यांना कोणतेही बंधन नाही. सर्रासपणे तंबाखूजन्य पदार्थ विकले जात आहेत. त्यांना कोणतीही बंधन नाही. फक्त खेळण्यातच मनाई कशाला? आम्ही देखील खेळणी पार्सल स्वरुपात विकू शकतो असे व्यवसायिकांचे म्हणणे आहे.