चाळीसगाव । येथील राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाची मासिक बैठक गुरुवारी 29 रोजी भडगाव रोडवरील संस्था कार्यालयात घेण्यात आली. अपात्र झालेल्या संचालकांची नियुक्ती करण्यात आल्याने विरोधी गटाच्या 7 सदस्यानी बैठकीवर बहिष्कार घातला. यावेळी चेअरमन एम.बी.पाटील, सचिव अरुण निकम यांनी अपात्र संचालक जगन्नाथ वाणी यांच्या जागेवर नियमबाह्य नियूक्ती बाबत 11 विषयांपैकी विषय क्रमांक 8 अन्वये आग्रह लावुन धरल्याने विरोधी गटाच्या 7 संचालकांनी यास विरोध दर्शवला. महाराष्ट्र राज्य सहकारी कायद्यानुसार पद भरता येत नसल्याचे सांगत या जागेसाठी प्राधिकरणाची परवानगी आल्यानंतर रिक्त जागा भरावी असा आग्रह संचालक शेषराव पाटील, अविनाश देशमुख, बाळासाहेब चव्हाण, सुधीर पाटील, धनंजय चव्हाण, पुष्पा भोसले, रमेश पाटे यांनी लावुन धरला. चेअरमन व सचिव यांनी बहुमताच्या जोरावर विषय मंजूर करुन घेतल्यानंतर या संचालकांनी निषेध म्हणुन बहिष्कार टाकुन याची तक्रार सहकार खाते व शासनाकडे करणार असुन चुकीचे व बेकायदेशीर कामे करण्यापासून रोखणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. पत्रकावर विरोधी गटाच्या 7 संचालकांच्या पत्रकावर स्वाक्षरी आहे.