शिरपूर । मागील महिन्यात कारखाना सुरु करावा यासाठी आपल्या तालुक्यातील शेतकर्यांतर्फे ‘शेतकरी विकास फौंडेशन’ यांनी निवेदन दिले होते त्या निवेदनावर कारखान्याचे चेअरमन, व्हा.चेअरमन यांनी संचालक मंडळाची मिटिंग न घेता परस्पर निवेदन प्रसिद्धीला दिले असल्याचा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहुल विश्वासराव रंधे व डिंगबर पांडू माळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. याप्रकीयेवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. कारण त्या निवेदनात जी कर्जाची आकडेवारी दिलेली आहे ती आजपर्यंत मिटिंगपुढे आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. कोणाचे किती कर्ज आहे ते न सांगता 151 कोटीचा कर्जाचा आकडा दिला असल्याचा आरोप दोघं संचलकांनी केला आहे.
कर्जामुळे कारखाना सुरूसाठी अडचण
वास्तविक ही कर्जाची आकडेवारी निवडणुकीच्या आधीचीच असल्याचा दावा केला आहे. यामुळे आज कर्ज पुढे करून कारखाना सुरु होवू शकत नाही असे चित्र चेअरमन यांनी सदस्यांपुढे ठेवले ते त्यांना मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. कारण या कर्जापैकी कुणीही आज कारखाना सुरु करायला अडचण निर्माण करीत नाहीत. जिल्हा बँकेचे कर्ज भरा मगच कारखाना ताब्यात देऊ असे पत्र दिलेले नाही. यामुळे कारखाना सुरु होणेस कुठलीही अडचण नाही.पीएफ रकमेला देखील स्टे मिळालेला असून शेतकर्यांचे निवेदन हे योग्य असल्याचे म्हटले आहे. संचालक मंडळाची सभा घेतली असती तर त्यावर दोघांनी सविस्तर चर्चा केली असती असे सांगून चेअरमन यांनी केलेल्या खुलासावर आम्ही दोन संचालक सहमत नासल्याचे कळविले आहे.