संजय ईप्पर व नरेंद्र नाईक यांच्या विरोधात चौकशीचे आदेश

0

जळगाव। येथील ज्येष्ठ सामाजिक व आर.टी.आय. कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे माजी महानगराध्यक्ष उल्हास साबळे व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार निर्मुनल कृती समितीचे जिल्हाध्यक्ष हेमचंद्र काळे (हल्ली मयत) यांच्या नावाचा दुरुपयोग करून त्यांच्या नावाने जळगाव येथील तापी पाटबंधारे विभागाचे तत्कालीन अधिक्षक अभियंता व हल्लीचे माहिती आयुक्त औरंगाबाद विभाग व्ही. डी. पाटील यांचे विरोधात मुख्यमंत्री यांच्याकडे खोटारडी व निनावी स्वरूपाची तक्रार केल्याप्रकरणी संजय ईप्पर व नरेंद्र नाईक यांचे विरोधात उल्हास साबळे यांनी जळगाव येथील न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीरून त्यांनी याबाबत पोलिस निरीक्षक जिल्हा पेठ जळगाव यांना चौकशीचे आदेश पारीत केले आहेत.

या प्रकरणी तक्रारदार साबळे यांनी 23 जानेवारी 2014 रोजी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला लेखी फिर्याद दाखल केली होती. परंतु पोलिसांनी फिर्याद नोंदविण्यास टाळटाळ केल्याने साबळे यांनी 2014 ते 2017 या तब्बल तिन वर्षातील दिरंगाईबाबत खुलासेवार मुद्दे न्यायालयासमोर मांडून वस्तुस्थितीजन्य पुरावे सादर करून भक्कमबाजु मांडल्याने सीआरपीसी 202 प्रमाणे जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला चौकशी करून न्यायालयात अहवाल सादर करणेबाबत आदेश दिले आहे.