बारामती । स्वातंत्र्य दिनानिमित्त बारामती तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची लाभार्थी निवड सभा समितीचे अध्यक्ष राहुल तावरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेसमोर आलेल्या विविध प्रकरणांच्या 254 अर्जांपैकी 214 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.
सभेत 254 अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये संजय गांधी योजनेच्या 159 प्राप्त अर्जापैकी 146 मंजूर तर 13 अर्ज नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजनेच्या 95 प्राप्त अर्जापैकी 68 मंजूर तर 27 अर्ज नामंजूर करण्यात आले. यावेळी तहसिलदार हनुमंत पाटील, समिती सदस्य अजित शिंदे, संगिता पोमणे, दत्तात्रय लोणकर, शहाजी कदम, राजेंद्र डोंबाळे, गणेश करंजे, लतीफा शेख, विजयकुमार देवकाते, उदय चावरे, शासकीय सदस्य गट विकास अधिकारी प्रमोद काळे, संजय गांधी नायब तहसिलदार एस. ए. भोसले उपस्थित होते.