रावेर : संजय गांधी निराधार योजनेची तब्बल 1200 प्रकरणे मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये ऑगस्ट 2020 पासूनच्या प्रलंबीत प्रकरणांचा समावेश आहे. मार्च महिन्यानंतर तससील कार्यालयात बैठक होवून पडताळणी करून प्रकरणे मंजूर केली जाणार असल्याचे संजय गांधी विभागा तर्फे सांगण्यात आले आहे. तालुकाभरातील वृद्ध, निराधार, गरीब व अपंग बांधवांचे लक्ष पुढच्या होणार्या बैठकीकडे लागले आहे. रावेर तालुक्यातील गरीब, निराधार, वृद्ध अपंग बांधवांनी विविध योजनेंर्तगत लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज केला आहे. मागील ऑगस्ट 2020 पासुनचे विविध प्रलंबीत प्रकरणे आहे. जानेवारीमध्ये झालेल्या बैठकीत फक्त दोनशेच प्रकरणे मंजूर केले होते. परंतु मागील वर्षापासुनचे सुमारे बाराशे विविध प्रकरणे प्रलंबित आहे. यामध्ये संजय गांधी निराधार श्रावण बाळ, योजना इंदिरा गांधी योजना, अपंग बांधवांच्या विविध योजना प्रलंबीत आहे. लवकर बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याची मागणी लाभार्थींमधून होत आहे.