संजय गांधी पेन्शन योजनेचा 1 हजार 141जणांना लाभ

0

पिंपरी-चिंचवड : रहाटणी येथे बळीराज गार्डन येथे संजय गांधी योजना शिबिर झाले. यामुळे 1 हजार 141 अंध, अपंग, मुकबधीर, कर्णबधीर, विधवा, घटस्पोटित महिला, 63 वर्षा वरील जेष्ठ नागरिक यांना निवृत्तवेतनाचा लाभ मिळाला.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी संजय गांधी योजनेचे अध्यक्ष गोपाळ माळेकर, तहसीलदार गितांजली शिर्के, संजय गांधी तहसीलदार सुनिता आसवले. मुळशी नायब तहसीलदार उषा ठोंबरे, परिमंडल अधिकारी दिनेश तावरे, नायब तहसीलदार संजय भोसले, संजय गांधी समिती सदस्या नरेंद्र माने, दिलीप गडदे, बिभीपण चौधरी, अश्‍विनी तापकिर, अदिती निकम, चैत्राली शिन्दे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, बाबा त्रिभुवन, सविता खुळे, आदी उपस्थीत होते.