पिंपरी चिंचवड : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील विधवा, निराधार, अपंग तसेच निराधार व्यक्ती असलेल्या 81 जणांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पेन्शन मंजूरी पत्रांचे वाटप शिवसेनेच्या पिंपरी चिंचवड शहर महिला संपर्क प्रमुख वैशालीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले.
यावेळी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेनेच्या संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष नितीन घोलप, सदस्य उत्तम कुटे, माजी नगरसेवक संजय साळवी आदी उपस्थित होते. आमदार चाबुकस्वार यांच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमामध्ये संजय गांधी आणि अपंग योजनेच्या 48 तर श्रावणबाळ योजनेच्या 33 जणांना पेन्शन मंजूरीचे पत्रे सुपूर्द करण्यात आली.