मुंबई । 1993 च्या बाँबस्फोट मालिकाप्रकरणी कारागृहात असताना हिंदी चित्रपट अभिनेता संजय दत्त याने त्याला सैन्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तशी इच्छा प्रदर्शित करणार्यान कविता, गाणी आणि शायरी त्याने पुण्यातील येरवडा कारागृहात असतांना लिहिल्या होत्या. त्याचवेळी त्याच्या सोबत मालेगाव बाँबस्फोटातील आरोपी निवृत्त मेजर रमेश उपाध्याय हाही होता. येरवडा कारागृहात संजय दत्त असताना त्या ठिकाणी निवृत्त मेजर रमेश उपाध्याय होता. 2008च्या मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील तो आरोपी आहे.
येरवाडा कारागृहात मनोगत व्यक्त
संजय दत्त आणि रमेश उपाध्याय या दोघांना एकाच बॅरेकमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्या दोघांनी त्यांचे मनोगत एकमेकांसमोर मांडले होते. त्यात काही लिखाणाचा समावेश होता. या दोघांमध्ये बर्यााच वेळा पत्रव्यवहार झाल्याचे उपाध्यायचा मुलगा विशाल उपाध्याय यांनी सांगितले. पूर्वीच्या कालखंडात संजय दत्त आणि निवृत्त मेजर रमेश उपाध्याय हे दोघेजण अनेक कार्यक्रमांत एकाच व्यासपीठावर भेटले होते. त्यांची याआधीही अनेकदा भेट झाली होती, असेही विशाल उपाध्याय म्हणाले.