पाचोरा । संजय धमाळ यांनी अमळनेर नगर पालिकेत कार्यरत असतांना करोडोचा घोटाळा केला असल्याचे समोर आले असतांनाही त्यांची नियुक्ती पाचोरा नगर परिषदेत करण्यात आली आहे. पाचोरा नगरपरिषदेत त्यांच्याकडे आर्थिक व्यवहाराची कामे देण्यात आलेली आहे. धमाळ व मुख्याधिकारी हे नातेवाईक असल्याने मनमानी कारभार करत असून त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी किशोर रायसाकडा आणि सचिन पाटील यांनी केली आहे.
मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना दिले. धमाळ यांनी पाचोरा नगरपरिषदेतच्या नियममित वसुलीमध्ये अपहार केल्याने त्यांच्यावर पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलंकीत अधिकार्यांला सेवेत ठेवणे योग्य नसल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे अशी मागणी होत आहे.