संजय निराधार अंतर्गत सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना निवृत्ती वेतन द्या

0

शहादा । इंदिरा गांधी, वृध्दापकाळ, निवृत्ती वेतन, श्रावण बाळ, अपंग-विधवांचे आदि लाभार्थ्यांना त्वरीत विविध योजनांचा अनूदान त्वरीत मिळावे अशी मागण्यांचे अखिल भारतीय किसान सभा व शेतमजूर युनियनच्या वतीने तहसील कार्यालयासमोर विराट मोर्चाच्या स्वरूपात तहसिलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना काँम्रेट माणिक सुर्यवंशी, विजय पाटील, मोहन शेवाळे, व्दारकाबाई गांगुर्डे, रामदास मोरे, विजय चौधरी, बेबीबाई न्हावी, दिलीप पाडवी, भारती देसाई, छाया कोळी कैलास पाटील, दिपक पाटील. मनिस पाटील, धर्मा पवार, सिताराम माळी, राजु गिरासे, प्रदिप बोरसे, दंगल सोनवणे, गुलाब मालचे आदिंनी आपला सहभाग नोंदवला.

निवेदनात या आहेत मागण्या
संजय निराधार अंतर्गत सर्व योजनांच्या लाभार्थाीना त्वरीत चार महिन्याचे निवृत्तीवेतन पाठवावे. तसेच सर्व बँक अधिकारींची मिटींग बोलवून वेतन बँकेत आल्यादिवशीच संबधीत लाभार्थ्याचा खात्यावर जमा करावे, नविन शिधापत्रिकांचे अर्जमंजुर करीत नविन शिधापत्रीका सात दिवसाच्या आत द्याव्यात, 2015-16 व 16 मे ते 1 जून17 पर्यतच्या इंदिरागांधी, वृध्दापकाळ, निवृत्ती वेतन, श्रावन बाळ, अपंग-विधवांचे संजय निराधारच्या अर्जाचे काय झाले? मंजुर त्रुटीच्या अर्जदार लाभार्थीला पत्राद्वारे कळवावे. शहादा सेतु केंद्रातील इ.उप्रवर्गातील विद्यार्थी, नागरीकांचे किती अर्ज आलेत व किती ओबीसी दाखले दिले, याबाबत खुलासा करावा. शेतकरी, शेतमजूर, व कारागीर महिला व पुरूषांना 55 वर्षानंतर 3 हजार रूपये निवृत्ती वेतन देणार्‍या शासन निर्णयाची अमल बजावणी करावी. शेतकर्‍यांचे कर्ज माफ करा, 7/12 कोरा करा, ज्यांनी कर्ज भरले आहे त्यांना रोखीने रक्कम परत करावी. बि बियाणे, खते उपलब्ध करून द्यावीत, चिरडे दरा धरणांची पावसाळ्यात देखभाल आदि मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

लवकरच मिटींग करणार
इंदिरा गांधी, वृध्दापकाळ, निवृत्ती वेतन, श्रावण बाळ, अपंग-विधवांचे आदि लाभार्थ्याचा बँक खात्यावर जी रक्कम 21 दिवसात जमा व्हायची, ती रक्कम 15 दिवसात जमा करण्याच्या सुचना सर्व बँकच्या अधिकारींची मिटींग घेवून सांगणार
– मनोज खैरनार, तहसिलदार शहादा