नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना दिल्ली हायकोर्टाने आज दिलासा मिळाला आहे. कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी इराणींविरोधात दाखल केलेली अब्रुनुकसानीची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. या निर्णयासाठी स्मृती इराणींनी दिल्ली हायकोर्टाचे आभार मानले आहे.
6 years ago began a battle in a court of law to uphold my dignity. Today a semblance of justice all thanks to Hon’ble High Court of Delhi. A sense of gratitude for my family & legal team for standing by me through it all. However, the fight continues.
— Smriti Z Irani (@smritiirani) December 19, 2018
२०१२ मधील गुजरात विधानसभांच्या निकालावेळी स्मृती इराणी यांनी वृत्तवाहिनीवरील एका वादविवाद कार्यक्रमात बदनामीकारक आणि अश्लाघ्य विधान केले होते. त्यामुळे संजय निरुपम यांनी इराणी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. निरुपम यांच्या चारित्र्यावर टीका करून वैयक्तीक बदनामी केली आणि इराणी यांच्या वक्तव्यामुळे निरुपम यांच्या समाजप्रतिमेला धक्का पोहोचला असल्याचा आरोप निरुपम यांच्या वकिलांनी केला होता. या प्रकरणी कोर्टाने इराणींना समन्सही बजावले होते.