मुंबई : मुंबईतील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी पल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपविला.
मुंबई महापालिकेत काँग्रेसचे याआधी ५२ नगरसेवक होते. आता ही संख्या ३१ झाली आहे. पक्षातील दुफळी, गटबाजी यामुळे या निवडणुकीत निरूपम एकाकी पडले होते.
दरम्यान, परळी येथील पराभवानंतर त्याची जबाबदारी स्वीकारून बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा येण्याआधीच तो फेटाळून लावला. पराभवाची जबाबदारी स्वीकारून शिवसेनेचे दादा भुसे यांनीही राज्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ केल्याचे समजते.