संजय राऊत म्हणतात, युतीचा निर्णय भारत-पाक फाळणीपेक्षाही भयंकर

0

मुंबई: विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. वेळापत्रक जाहीर झाले आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आहे. २७ सप्टेंबरला अधिसूचना निघणार आहे. युतीचे घोडे मात्र अद्याप अडकूनच आहे. युती होणार की नाही महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात २८८ जागांवर विधानसभा निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील युतीचा निर्णय हा भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षाही कठीण विषय असल्याचे विधान केले आहे. संजय राऊत यांचे हे विधान अचंबित करणारे आहे. युतीचा विषय भारत-पाक फाळणीपेक्षाही कसा किचकट असू शकतो असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आपण सरकारमध्ये न राहता आपण विरोधी पक्षात बसलो असतो तर आजचे चित्र वेगळे असते. जागांबाबत आम्ही जे काही ठरविणार आहोत ते आपल्याला कळवू असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.

लोकसभेप्रमाणे विधानसभेतही भाजप-सेनेची युती होईल असे बोलले जात आहे. मात्र काहींना युती होणार नाही असे वाटत आहे. युतीबाबतचा निर्णय लवकरच जाहीर होईल असे दोन्ही पक्षाचे नेते म्हणत आहेत.