संजय राऊत यांच्यामुळे युतीत तणाव: गिरीश महाजन

0

नाशिक: राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. दररोज नवनवीन वक्तव्य समोर येत असल्याने युतीत तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षात चढाओढ सुरू आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला नाही. दरम्यान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे युतीत तणाव निर्माण झाल्याचे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले आहे. सध्या सर्व काही बोलण्याचे अधिकार संजय राऊत यांनाच आहे असा टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला. नाशिक येथे नुकसानग्रस्त भागाचा दौरा गिरीश महाजन यांनी केला, यावेळी त्यांनी हे यावर भाष्य केले.

आम्हाला देखील खूप काही बोलता येते, परंतु आम्ही सध्या काहीही बोलत नाही. संजय राऊत यांच्यामुळे युतीत तणाव निर्माण झाला आहे असे गिरीश महाजन यांनी सांगितले. संजय राऊत यांच्याकडून दररोज नवनवीन वक्तव्य समोर येत आहे. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे संजय राऊत सांगत आहे. आमच्याकडे १७५ आमदारांचा पाठींबा आहे, असे सांगत लवकरच शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.