संजय राऊत यांनी चक्क रुग्णालयाच्या बेडवरून लिहिला अग्रलेख !

0

मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेचा पेच अधिकच मोठा झाला आहे. काल शिवेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले होते. मात्र वेळेत राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या पाठींब्याचा पत्र मिळाले नसल्याने शिवेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आले नाही. त्यामुळे मोठी राजकीय घडामोडींना वेग आले आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना काल लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात देखील ते राजकीय स्थितीवर लक्ष ठेवून असून सामना या शिवसेनेच्या मुखपत्रासाठी त्यांनी अग्रलेख देखील त्यांनी लिहिला आहे. रुग्णालयाच्या बेडवर त्यांनी अग्रलेख लिहिला आहे.

उद्याच्या या अग्रलेखाकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. राजकीय परिस्थितीवर या अग्रलेखातून भाष्य होणार आहे. प्रकृती बरी नसताना देखील त्यांनी अग्रलेख लिहिला असल्याने त्यांच्या पत्रकारीतेबाबतचा कौतुक होत आहे.