सूर्यकांत वाघमारे यांचा वाढदिवसानिमित्त
देहूरोड : शालेय साहित्य, धान्य वाटप आणि वृक्षारोपण करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांचा वाढदिवस तळेगाव शहर आरपीआय व दिवगंत संजय सोनवणे प्रतिष्ठाणच्यावतीने उद्योगधाम व संजीवनी बालिका आश्रम येथे शालेय साहित्य, धान्यवाटप, वृक्षरोपण करुन साजरा करण्यात आला.
संग्राम काकडे यांचा सत्कार
संजीवनी बालिका आश्रम येथे झालेल्या कार्यक्रमावेळी तळेगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, हवेली तालुका भाजपा अध्यक्ष रोहिदास उंड्रे पाटिल, सी. आर. पी. एफ.चे अधिकारी हिंदुराव सांळुके, दत्तात्रेय म्हाळसकर, आर. पी. आय. तळेगाव शहराचे कार्याध्यक्ष महेंद्र चव्हाण, मावळ तालुका संघटक अशोक सोनवणे, युवक अध्यक्ष शांताराम चव्हाण, रविंद्र साबळे, तळेगाव शहर संघटक राहुल गायकवाड, अभिजीत संजय सोनवणे, आमीन शेख, मावळ तालुका कार्याध्यक्ष शिवाजी बनसोडे, योगेश घोडके, सुधीर ढोरे आदि उपस्थित होते. तळेगाव आर.पी.आयच्यावतीने उपनगराध्यक्ष संग्राम काकडे यांचा उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला.