संजीवन समाधी दिन सोहळा 30 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2018 या काळात

0

आळंदीमध्ये नियोजन पूर्व बैठक उत्साहात

3 डिसेंबर रोजी पार पडणार कार्तिकी एकादशी सोहळा

आळंदी : माऊलींचा संजीवन समाधी दिन सोहळा 30 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2018 या काळात आळंदीत होत आहे. यासाठी आळंदी यात्रेतील सुविधा अडीअडचणी, नियोजनासाठी खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांचे अध्यक्षतेखाली आळंदीत शासकीय खात्यातील प्रमुख अधिकारी, पदाधिकारी यांची प्रशासकीय बैठक उत्साहात झाली. नगरपरिषदेच्या सभागृहात या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी, नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, चर्‍होली सरपंच अश्‍विनी सस्ते, मुख्याधिकारी समीर भूमकर, उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, आळंदी देवस्थानचे विश्‍वस्त अजित कुलकर्णी, नगरसेविका सुनीता रंधवे, नगरसेवक प्रकाश कुर्‍हाडे, सागर भोसले, संतोष गावडे, सामाजिक कार्यकर्त्या पुषा कुर्‍हाडे, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर वीर, वीज महावितरणाचे ज्ञानेश्‍वर गित्ते, आरोग्य, पाणी पुरवठा, महसूल, सार्वजनिक प्रवासी वाहतू  बी.एस.एन.एल.पोलीस प्रशासन, विविध शासकीय खात्याचे अधिकारी या प्रशासकीय बैठकीस उपस्थित होते.

यात्रेपुर्वी अतिक्रमण काढावे

तहसीलदार सुचित्रा आमले यांनी उपस्थित शासकीय खात्यांचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांना यात्रेच्या तयारीसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला. नियोजना प्रमाणे कामकाज करण्यास उपस्थित अधिकार्‍यांना सांगितले. यावेळी नगराध्यक्षा उमरगेकर यांनी येथील दर्शनबारीचा प्रश्‍न भाविकांसाठी प्राधान्याने संवादातुन सोडविला जाईल असे सांगितले. यासाठी माऊली मंदिर, खाजगी जागा मालक आणि नगरपरिषद यांच्या समवेत चर्चा केली जाईल असे सांगितले. देव दर्शनासाठी भाविकांची गैरसोय होऊ देणार नाही. यावेळी विकासाची कामे आराखड्यातील निधीतून सुरु आहेत. मात्र उर्वरित कामे खड्डे, पथदिवे, अतिक्रमण यात्रेपूर्वी काढण्यास सुचविण्यात आले. 25 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन मुख्याधिकारी भूमकर यांनी सांगितले. यात्रा कालावधीमध्ये गावामध्ये वीज असेल. गाव भारनियमन मुक्त रहाणार असल्याचे अभियंता ज्ञानेश्‍वर गित्ते यांनी यावेळी सांगितले.

स्वच्छता गृहांची सुविधा

अखंडित वीज व पाणी पुरवठा सेवा, स्वच्छता मोहीम, स्वच्छता गृहांची सुविधा यासाठी नियोजन केले असल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. आळंदी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवेसाठी रुग्णालय 24 तास आरोग्य सेवा देणार असल्याचे आरोग्य सेवक संदीप गोरे यांनी सांगितले. वाढीव पोलीस बंदोबस्त, भाविकांची सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, शांतता सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत असल्याचे नियोजन पोलीस निरोक्षक रवींद्र चौधरी यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, नगरसेवक प्रकाश कुर्‍हाडे, संतोष गावडे, नगरसेविका सुनीता रंधवे यांनी मते मांडली. श्रींचे दर्शन तसेच महिला नगरसेविकांना औक्षणाची संधी बाबत देवस्थानला यावेळी नगरसेविकांनी धारेवर धरले. विश्‍वस्त अजित कुलकर्णी यांनी दक्षता घेतली जाईल असे यावर सांगितले. नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर, मुख्याधिकारी समीर भूमकर, मारुती कोकाटे,विविध विभाग प्रमुख यांनी चर्चेत भाग घेतला.