संजीवन समाधी सोहळ्यास 30 नोव्हेंबरला प्रारंभ

0

आळंदीत 3 डिसेंबरला कार्तिकी एकादशी

आळंदी : संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा 723 वा संजीवन समाधी दिन सोहळा आळंदीत 30 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत होत असल्याचे प्रमुख विश्‍वस्त अ‍ॅड. विकास ढगे पाटील यांनी सांगितले. आळंदी मंदिरातील धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत श्री गुरु हैबतराव बाबा यांच्या पायरी पूजनाने विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात दि.30 होणार आहे. यावेळी माऊलींच्या मंदिरात, कीर्तन, महाप्रसाद, पालखी मिरवणूक, रथोत्सव, अभिषेक, महापूजा असे विविध धार्मिक कार्यक्रम नियोजित आहेत. कार्तिकी यात्रेत एकादशी दिनी श्रींची पहाट पूजा, द्वादशी (दि.4 ) संजीवन समाधी दिन सोहळा होणार आहे. या निमित्त मंदिरात संत नामदेवरायांचे वंशज नामदास महाराज यांचे कीर्तन, घंटानाद व मंदिरात पुष्पवृष्टी होईल. माऊलींचे पालखीची नगर प्रदक्षिणा व छबिना मिरवणुकीने संजीवन समाधी सोहळ्याची सांगता दि.7 रोजी होणार आहे. यानिमित्त तीर्थक्षेत्र आळंदीत तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.