संजीव पुनाळेकरसह विक्रम भावेंची सुटका करा

0

सनातनतर्फे प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन ; अटकेचा केला निषेध

भुसावळ- हिंदू विधीज्ञ परीषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्यासह माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांची सुटका करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने प्रांताधिकारी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या अटकेचा निषेधही करण्यात आला आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने दाभोळकर हत्य प्रकरणी अटक केली असून डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी गेल्या तीन वर्षांत सीबीआयने अनेक निरपराध हिंदूना संशयीत म्हणून अटक केल्याचे निवेदनात नमूद आहे.

सीबीआय कारवाई निषेधार्थ
अधिवक्ता पुनाळेकर यांना एका संशयीत आरोपीने दिलेल्या जबाबावरून अटक केली असून सीबीआयने केलेली अटक चुकीची आणि निषेधार्थ आहे. हिंदूत्ववादी म्हणवणारे शासन सत्तेत असताना हा प्रकार होत असून सीबीआयचे वागणे संशयास्पद आणि हिंदूत्ववाद्यांवर दबावतंत्र निर्माण करणारे आहे. या प्रकरणी सनातन संस्थेने 12 मुद्यांवर प्रकाशझोत टाकणारे निवेदन सनातन संस्थेने प्रांताधिकार्‍यांना दिले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे उमेश जोशी, नमा शर्मा, पियुष महाजन, मनोज चौधरी, शुभम पचेरवाल, भूषण कोळी, सागर भोई, धीरज वडोणकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.