संततधार पावसाने तालुक्यातील शेतकरी सुखावला

0

बारामती । शनिवारी रात्री 11.30 वाजल्यापासून तालुका व परिसरात पावसाने हजेरी लावली असून संततधार सुरूच आहे. यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे आनंदाचे वातावरण आहे. जुनच्या पहिल्या पंधरवडयात झालेल्या चांगल्या पावसानंतर जवळपास दिड महिना पावसाने दडी मारली होती. हा पाऊस मुरपाऊस असल्याने विहीरीच्या पाण्याची पातळी वाढण्यास चांगलीच मदत होणार असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले बारामती तालुक्याच्या पश्‍चिम भागातील जिरायती भागात खरीपाची पिके जोमात आहेत. मात्र मध्यंतरी पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. अशातच पावसाने पुन्हा जोर धरल्याने खरीपाचे पीक हमखास हाती येणार असल्याने शेतकरी चिंतामुक्त झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात अवर्षणग्रस्त भागात पावसाने चांगलाच आधार दिला असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.