संततधार पावसाने रंगावली नदी दुधडी

0

नवापूर । नवापूर तालुक्याची जीवनदायनी रंगावली नदी सततधार पावसाने दुधडी भरुन वाहत आहे. त्या बरोबर रंगावली मध्यम प्रकल्प पुर्णपणे भरला असुन दैनिक पत्रकार संघाने गाळ काढल्याने पाण्याची साठवण क्षमतेत वाढ झाली आहे. रंगावली प्रकल्पातील पाणी पाहण्यासाठी शहरातुन हौशी नवापुरवासी जात असुन रिमझीम पाऊसाची मजा लुटत आहे.