संतप्त ग्रामस्थांतर्फे रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा

0

वरणगाव। येथील चार गावांच्या पाणीपुवरठा योजनेवरील थकीत विजबिलामुळे योजनेवरील विज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यामुळे चार गावांचा पाणीपुरवठा प्रभावीत झाला आहे तर ग्रामस्थांनी विज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन त्वरीत विजपुरवठा सुरळीत करा अन्यथा 27 ला रास्ता रोको करून आंदोलन छेडण्यात येणार आहे.पाण्यासाठी नागरिकांची भटकंती वरणगाव शहरापासून जवळच असलेल्या कठोरा येथील तापी नदी किनारावरून फुलगाव, कठोरा खुर्द, कठोरा बुद्रुक, अंजनसोंडे या चार गावांना या योजनेवरून पाणीपुरवठा केला जातो. ही योजना जिल्हा परिषदेकडून चालविण्यात येते. या योजनेवर विजबिल थकीत आहे. गेल्या काही दिवसांपासून सदरच्या योजनेचे बील जिल्हा परिषदेने भरले नसल्याने थकबाकीपोटी विज वितरण कंपनीने या योजनेवरील विजपुरवठा खंडीत केला आहे. यामुळे चार गावातील नागरीकांना ऐन पावसाळ्यात देखील पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र चौधरी, राजकुमार चौधरी, कठोरा सरपंच प्रशांत पाटील व काही नागरीकांनी विज वितरण कंपनीशी संपर्क साधला. यावेळी कनिष्ठ अभियंता कार्यालयीन कामासाठी जळगावी असल्याने त्यांची भेट झाली नाही. तर येथील कनिष्ठ अभियंत्याशी चर्चा करून थकीत बील असल्यास गावातील सरपंचा सुचीत करा म्हणजे जिल्हा परिषदेकडून त्वरीत बील भरण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. अशा प्रकारची सुचना मांडली. तसेच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधुन त्वरीत विजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी गावकरी करणार आहेत.

जिल्हा परिषदेशी बोलणे सुरू आ्हे. लवकरच बील भरण्याची मागणी केली आहे. तरी पण 26 पर्यंत विजपुरवठा सुरळीत झाला नाही तर 27 तारखेला विज वितरण कंपनीच्या कार्यालया समोर रास्ता रोको करण्यात येणार आहे.

राजेंद्र चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य.