रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा अडीच तास गोंधळ; पुष्पक मुंबईपर्यंत नेण्याच्या निर्णयाने वादावर पडदा
रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाने प्रवाशांचा संताप; आबालवृद्धांचे प्रचंड हाल
भुसावळ । दुरांतोचा अपघात व त्यातच मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याचा फटका प्रवाशांना सोसावा लागत आहे. शुक्रवारी अप 12533 लखनऊ-मुंबई पुष्पक भुसावळात आल्यानंतर ती मुंबई ऐवजी भुसावळातून पुन्हा परतीच्या प्रवासात निघेल या उद्घोषणेनंतर प्रवाशांचा संयमांचा बांध सुटला व त्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत प्लॅटफार्म क्रमांक तीनवर आलेल्या अप काशी एक्स्प्रेसच्या इंजिनापुढे ठिय्या मांडत संताप व्यक्त केला. अप पुष्पक मुंबईपर्यंत नेण्याच्या मागणीवर प्रवासी ठाम राहिल्याने रेल्वे प्रशासनाने नमते घेत अखेर जळगाव-सुरतमार्गे मुंबईपर्यंत पुष्पक एक्स्प्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांनी आपले आंदोलन मागे घेतले. शुक्रवारी सकाळी 11.30 पासून सुरू झालेल्या आंदोलनाची दुपारी दोन वाजेपर्यंत हा घोळ चालल्याने आबालवृद्धांचे चांगलेच हाल झाले. दुरांतोचा टिटवाळ्याजवळ अपघात झाल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मनमाड-नाशिकच्या प्रवाशांची गीतांजलीने केली सोय
अप पुष्पक जळगावमार्गे सुरत व तेथून मुंबई जाणार असल्याने या गाडीतील मनमाड व नाशिकपर्यंत प्रवास करणार्या प्रवाशांची मात्र अप गीतांजली एक्स्प्रेसने जाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. रेल्वे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
प्रवाशांचा सुटला संरम
लखनौ ते मुंबई प्रवास करणार्रा सुमारे 2500 प्रवाशांना घेऊन निघालेली अप पुष्पक मुळातच लखनौ स्थानकावर 20 तास उशीरा आल्राची कैफिरत प्रवाशांनी मांडली. आरक्षण केले असतानाच आधीच गाडी उशीराने धावत असताना भुसावळात अचानक ही गाडी आल्रानंतर मुंबईपर्रंत धावणार नसल्राची उद्घोषणा झाल्राने प्रवाशांनी रेल्वे स्टेशन मॅनेजर एस.के.कुठार रांना फैलावर घेत संताप व्रक्त केला. प्रभू सिंग, मुकेश सिंग, संजर दुबे, सलीम, शिवशंकर, उर्वीस सिंग रा प्रवाशांनी तीव्र संताप व्रक्त करीत रेल्वे प्रशासनाला धारेवर धरत आंदोलन केले.
आंदोलनाला आले रश
अप पुष्पकमधील शेकडो प्रवाशांनी अप काशी एक्स्प्रेस रोखून धरत रेल्वे प्रशासनाला घाम फोडला. परिस्थिती चिघळू नये यासाठी लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्यांनी तातडीने धाव घेत प्रवाशांना शांत राहण्राचे आवाहन केले. सकारात्मक निर्णर घेण्राचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिल्रानंतर काशी एक्स्प्रेस समोरून प्रवासी हटले व ही 1 वाजून 8 मिनिटांनी तर अप पुष्पक दुपारी दोन वाजता रवाना झाली.