तळोदा । गेल्या 2 ते 3 दिवसापासून विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होत असल्राने सुमारे 150 ते 200 संतप्त शेतकर्यांनी रात्री 11वा. मोर्चा काढुन अभियंता इम्रान पिंजारी यांना घेराव घालून विजे अभावी शेतकरी मालांच्या पिकाचे नुकसानिस जबाबदार कोण? असा सवाल करत संताप व्यक्त केला.
या पिकांचे होतेय नुकसान
तळोदा परिसरातील वीजपुरवठा 2 ते 3 दिवसापासून खंडित असल्याने वीजपुरवठ्याअभावी 500 ते 600 शेतकर्यांचे तीव्र उन्हामुळे ऊस,केली,पपई,उन्हाळी मका,टरबूज,या पिकांचे पाण्याअभावी नुकसान होत असून गेल्या दोन तीन दिवसापासून वीज वितरण कंपाणीच्या कर्मचारीचा कामाची दिरंगाईमूळे तसेच वेळेत काम न करणे ह्यामुले दोन दोन दिवस विद्युत पुरवठा खंडित असतो शेतकरी बांधवांचा संताप झाल्याचे बघुम वितरण विभागाचे कर्मचारी तात्काळ कामाला लागले या वेळेला अभियंता पिंजरी यांनी सहकार्याची विनंती केली. रात्रीच शेतकर्यांना सोबत घेऊन विधुत कर्मचारी व अभियंता यांनी 2:30 वस्ता बिघाड शोधून विद्युत पुरवठा पुर्ववत करण्यात आला त्यातही निम्मेच कृषी पंप चालू करण्यात आले हा विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत असून वाहिणी वरील संख्या वाढवावी व जीर्ण तारा बदलण्याची मागणी देखील करण्यात आली. या वेळी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी राजेंद्र टवाळे,मुकेश माळी, श्रीनिवास पिंपरे,उत्तम टवाळे,राहुल धनगर,मयूर पाटील,संजय गाडे,भरत कर्णकार,कल्पेश कर्णकार,कल्पेश चौव्हान,जितेंद्र शेंडे,भामट्या पाडवी आदी शेतकर्यांनी सहकार्र केले. सहाय्रक अभियंता इम्रान पिंजारी यांनी वाहिनी वरील दोष दुरुस्त करुन बंद काळातील विद्युत पुरवठा पुढील चार दिवस जास्त वेळ विज देऊन भर काढण्यात येईल असे आश्वासित केले.