संतांचे ग्रंथ हे मार्गदर्शक दीपस्तंभ

0

वाकड : देवाचे स्वरूप कवेत घेऊ पाहणारे शब्द आणि या शब्दांना झेलून सांभाळून ठेवणारी कुपी म्हणजे ग्रंथ, जो ही कुपी सांभाळतो व त्यातील अवीट अमृत आयुष्यभर चाखतो, तोच अमर होत असतो. संतांचे ग्रंथ हे आयुष्याच्या मार्गातील मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नाना काटे यांनी व्यक्त केले. पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरात श्रावणमासानिमित्त शिवशंभो सेवा मंडळाच्या वतीने शिवलिला अमृत ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काटे बोलत होते.

यांची होती उपस्थिती
नगरसेवक नाना काटे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व शिवलिला अमृत ग्रंथाचे पूजन करून पारायण सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शिवशंभो सेवा मंडळाचे संस्थापक माऊली हांडे, बाळासाहेब काटे, गणेश काटे, हनुमंत भालेकर, पुजारी तसेच मंडळाचे सर्व सभासद व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्ञानपरंपरा जतन करावी
नगरसेवक नाना काटे पुढे म्हणाले की, संतांनी हे ग्रंथ आत्मसात केले आहेत व ग्रंथरचना ज्ञान जतन करण्याची सोयही करून ठेवली आहे. आपण ही ज्ञानपरंपरा जतन केली पाहिजे व आपले योगदान दिले पाहिजे, असे आवाहन काटे यांनी केले.