भुसावळ : शहरात मावशीकडे आलेल्या अल्पवयीन बालिकेचा मावसानेच विनयभंग केल्यानंतर पीडीता मामांकडे आली मात्र तेथे मामानेच बालिकेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणी तिघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मध्यप्रदेशातील एका गावातील 16 वर्षीय बालिका शहरात मावशीकडे आली असता तिच्यावर मावसा संतोष लागीर गिरी (53) यांनी विनयभंग केला. ही बाब मावशीला सांगितल्यानंतर त्यांनी दुर्लक्ष करीत बालिकेला मामा संतोष वामनराव भारती (34) यांच्याकडे पाठवले मात्र तेथे मामा भारती यांनीच बालिकेवर तब्बल सात महिने अत्याचार केले. पीडीतेने ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. गुरुवारी पीडीतेने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून कैफियत मांडल्यानंतर संतोष लागीर गिरी (53), संतोष वामनराव भारती (34) व प्रमिला संतोष गिरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष गिरी व संतोष भारती यांना अटक करण्यात आली. तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, सुभाष साबळे करीत आहेत.