संतापात घेतला गळफास मात्र सुदैवाने घटना लक्षात आल्याने वाचले तरुणाचे प्राण

A 33-year-old youth from Sakhli attempted suicide by hanging himself यावल : तालुक्यातील साकळी येथील 33 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्येा प्रयत्न केल्याने गावात खळबळ उडाली आहे. हा प्रकार निदर्शनास येतात कुटुंबीयांनी त्याला तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात हलवल्यानंतर प्रथमोपचारानंतर त्यास जळगावी हलवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. तरुणाने हा प्रकार का केला? याबाबतची माहिती कळू शकली नाही.

वेळीच सतर्कतेमुळे वाचले प्राण
साकळी येथील कैलास रामा महाजन (33) या तरुणाने बुधवार, 16 रोजी संतापाच्या भरात गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्याला तेथून त्यांनी यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरीता दाखल करण्यात आले. सचिन देशमुख, अधिपरीचारीका नेपाली भोळे, दीपाली किरंगे, मनीषा धांडे, सुमन राऊत आदींनी त्याच्यावर उपचार केले. मात्र त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला तातडीने 108 वाहनाद्वारे जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे.