संतोषी माता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव इंगळे यांनी महिलेस शिवीगाळ केल्याचा आरोप

0

भुसावळ- शहरातील संतोषी माता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव इंगळे यांनी पतसंस्थेतील ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ केली तसेच रकमेची मागणी केल्यानंतर शिविगाळ केल्याचा आरोप निर्मला सुरेश पाटील (रा.भुसावळ) यांनी करीत शनिवारी बाजारपेठ पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 च्या कलम 3 आणि 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. संतोषी माता पतसंस्थेत 20 महिन्यांच्या मुदतीसाठी मुदत ठेव योजनेत 28 हजार 409 रुपयांची रक्कम पाटील यांनी ठेवली होती. 13 मार्च 2013 रोजी ठेवलेल्या रकमेची मुदत 13 नोव्हेंबर 2014 संपली. मुदत संपल्यानंतर त्या रक्कम काढण्यासाठी पतसंस्थेत गेल्या होत्या मात्र इंगळे यांनी त्यांना शिविगाळ केली तसेच संचालकांशी संगनमत करून रक्कम देण्यास टाळाटाळ केली. इंगळे यांनी जास्त व्याजदराचे आमिष दाखवून इतरांकडूनही रक्कम जमा केली आहे, असे पाटील यांनी तक्रारीत नमूद केले आहे.