जामीन अर्ज फेटाळला ; 11 संचालकांचा अटकपूर्व नाकारला
भुसावळ- बनावट कागदपत्रांद्वारे 101 चा दाखला बनवून फसवणूक केल्याप्रकरणी संतोषी माता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव इंगळे आणि प्रशांत भारंबे यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आरोपींनी जामीन मिळण्यासाठी अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असलातरी फिर्यादीसह ठेवीदारांच्या वकीलांनी आक्षेप घेतल्याने न्यायालयाने इंगळे व भारंबे यांचा जामीन अर्ज फेटाळला तर 11 संचालकांनी अटकपूर्व जामीनासाठी दाखल केलेला अर्जही न्यायालयाने फेटाळल्याने संचालकांच्या गोटात मोठीच खळबळ उडाली आहे. संतोषी माता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव इंगळे व प्रशांत भारंबे यांच्या जामीन अर्जावर फिर्यादीचे वकील राजेंद्र रॉय, कर्जदारांचे वकील लतीफ पिंजारी, अॅड. संजय तेलगोटे, अॅड. मतीन अहमद यांनी काम पाहीले. अॅड. पिंजारी यांना अॅड. आशीष सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले.
संचालकांमध्ये खळबळ
संतोषी माता पतसंस्थेचे संचालक लक्ष्मण चावराई, नरहरी पाटील, अरूण गंथडे, अख्तर हुसेन मो. शकील, नितू किनगे, रमेश इंगळे, सोमा जावळे, पितांबर न्हाळादे, सीमा ढाके, निर्मला पाटील व दीपक पालकर आदी 11 संचालकांनीदेखील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला मात्र तोदखील न्यायालयाने फेटाळला आहे.