संतोष राजगुरू यांना जीवनगौरव

0

निमगाव केतकी । मराठी साहित्य विकास परिषद महाराष्ट्र राज्यतर्फे कै. भगवानराव भरणे साहित्य परिषदेने संमेलन आयोजित केले होते. यावेळी सावता परिषदेचे मुख्य संघटक संतोष राजगुरू यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिनेअभिनेत्री वर्षा उसगांवरकर यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, पुणे जि. प. बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रवीण माने, खरेदी-विक्री संघाचे संचालक कोंडीबा भोंग, मराठी विकास परिषदेचे अध्यक्ष विजय गायकवाड, उपाध्यक्ष अकबर शेख यांनी नियोजन केले ओबीसी अल्पसंख्याक समाजाचे सावता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या नेतृत्वाखाली संतोष राजगुरू बारा वर्षांपासून राज्यभर माळी समाजाचे संघटन करून संघर्ष करत आहेत. या गौरवसोहळ्याप्रसंगी चेअरमन विजय महाजन, दादासाहेब भिसे, वामन घाडगे, नारायण देशमाने, हभप कोंडिंबा भोंग उपस्थित होते.