संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छतेच्या पुरस्काराचे वितरण

0

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

या अंतर्गत अमळनेर तालुक्यातील मेहरेगाव ग्रामपंचायतीला स्वच्छतेच्या विषयावर प्रथम क्रमांक आल्याने ५ लाखांचा धनादेश देऊन सरपंच व ग्रामविकास अधिकार्‍यांचा अध्यक्षा ना.उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सीईओ शिवाजी दिवेकर यांच्याहस्ते गौरविण्यात आले. भुसावळ तालुक्यातील सुसरी ग्रामपंचायतीस ३ लाखाचे द्वितीय पारितोषिक, चोपडा तालुक्यातील वडोदे ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचे २ लाखांचे पारितोषिक देण्यात आले. तर उत्तेजनार्थ मध्ये सांडपाणी व्यवस्थापन विषयात चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे ग्रा.पं.ला स्व.वसंतराव नाईक पुरस्कारासह २५ हजाराचा धनादेश, कुटूंबकल्याण विषयात धरणगाव तालुक्यातील मुसळी ग्रा.पं.ला २५ हजार, सामाजिक एकता विषयात जामनेर तालुक्यातील बिलवाडी ग्रा.पं.ला २५ रुपयांचा धनादेश देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरविण्यात आले.