संत गाडगेबाबा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नदान

0

भुसावळ : शिवसेनेचे माजी शहरप्रमुख तथा जेष्ठ पत्रकार कै. सुभाष बागुल यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शनिवार 31 रोजी सायंकाळी गडकरी नगर भागातील संत गाडगेबाबा वसतिगृहातील गरीब विद्यार्थ्याना अन्नदान करण्यात आले. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे, नगरसेवक मुकेश गुंजाळ यांच्या हस्ते गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून वंदन करण्यात आले.

आठवणींना दिला उजाळा
स्व. बागुल हे बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक म्हणून प्रतिकूल परिस्थिती असतांना देखील पक्ष संघटन व मजबुतीसाठी तालुक्यात प्रयत्नशील राहिले. शेवटपर्यंत एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांची ख्याती कायमस्वरूपी सर्वांच्या स्मरणात आहे व राहील, असे सांगून सुभाष बागुल यांनी केलेल्या कार्याची माहिती प्रसंगी उपजिल्हा प्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे यांनी देवून स्व. बागुल यांच्या आठवणीना उजाळा दिला. यावेळी नमा शर्मा, राहुल, अशोक जाधव, दिवाकर विसपुते, अभिजित आढाव, अनिल बागुल, अमोल चौधरी, अजय चौधरी, हर्षल शिवदे, पवन कलापुरे, मंदार बागुल, गौरव तळेले, आकाश कोळी, इंदुमती चौधरी, जयश्री हातेकर, चंद्रकला बागुल, मोनाली तळेले, उज्वला बागुल, तेजस्विनी बोके आदी उपस्थित होते.