भुसावळ। सुरुवात धर्म शब्दाने, तर शेवट मम् शब्दाने हे गीतचे मर्म आहे. जी व्यक्ती धर्माने वागते, त्याचा सिद्धांत ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला आहे, संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक संदेश दिला असून वैश्विक चैतन्याचा झरा ज्ञानेश्वरीतून ओसंडून वात आहे. असे दगडू महाराज बामणोदकर यांनी सांगितले. शहरातील गायत्री मंदिरात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायणाचा सोमवारी समारोप झाला.
या वेळी ते बोलत होते. शहरातील जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघातर्फे गायत्री मंदिरात ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या मंगळवारपासून सुरू झालेल्या पारायणाचा सोमवारी समारोप झाला. या वेळी संघाचे अध्यक्ष प्रकाश विसपुते, प्रा.अरुण मांडाळकर, शांताराम बोबडे, सचिव अलका अडकर, जी.आर.ठाकूर यांसह भाविकांची उपस्थिती होती. निरुपणाच्या शेवटच्या दिवशी दगडू महाराजांनी ज्ञानेश्वरीतील बारकावे, संत ज्ञानेश्वरांनी दिलेले दृष्टांत सोप्या भाषेत समजावून सांगितले. कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.