शहादा। शहरात शिंपी समाजतर्फे 21 जुलै रोजी संत नामदेव महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी केली. पुण्यतिथीनिमित्ताने संत नामदेव महाराज यांचा प्रतिमेची पालखी मिरवणूक काढली. विठ्ठल मंदिराजवळ प्रथम समाजाचा मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन केल्यानंतर विठ्ठल मंदिरापासुन भोई गल्ली, महावीर गल्ली, तुप बाजार मेनरोडमार्गे पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत समाज बांधव व महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव
महिलांनी डोक्यावर कलश ठेवले होते मिरवणूक नंतर भोई समाज मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात समाजातील दानशूर देणगी दात्यांच्या व इय्यत्ता 10 वी 12 यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गुण गौरव करण्यात आला. यावेळी कलशात जमा झालेल्या पैशांचा लिलाव करण्यात आला त्यात कृष्णा केशवराव सोनवणे यानी 6771 रुपयात कलश घेतला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन दिनेश नेरपगार यांनी केले. दरवर्षी शिंपी समाजातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते शहरात समाजाचे चांगले संघटन झाल्याचे दिनेश नेरपगार यानी सांगितले.