जळगाव । श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था विश्वस्थ मंडळातर्फे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. श्रीमती मनोरमाबाई जगताप शिंपी मंगल कार्यालयातील नामदेव महाराज मंदीरात भालचंद्र पाटील यांच्याहस्ते माल्यार्पण अर्पण करण्यात आली. तुकाराम निकुंभ व रामकृष्ण शिंपी यांनी सपत्नीक पुजा केली. श्री नामदेव महाराजांची प्रतिमा रथामध्ये सजवुन पालखीही काढण्यात आली होती.
गुणवंत विद्यार्थ्यांचा केला गौरव
रथ व पालखी जुन्या जळगावातील गल्लीमधुन सुभाष पुतळा नंतर बालाजी मंदीरात आली. वाद्याच्या तालात व विठ्ठल नामदेव, तुकारामच्या गजराने परिसर दुमदमुन गेला होता. मिरवणुक बालाजी मंदीरात आल्यावर दुपारी 12 वाजता जमलेल्या समाज बांधवांच्या उपस्थितीत रविंद्र खैरनार, मोहन चव्हाण, पी.टी. शिंपी, रत्नाकर बाविस्कर, पद्माकर जगताप, सुरेश कापुरे, नितीन सोनवणे, शैलेंद्र भांडारकर, अंजनाताई जगताप, कांतीलाल बागुल, तुकाराम निकुंभ, अॅड. सुभाष चव्हाण यांच्याहस्ते नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पुजन, दीप प्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले. दरम्यान 1 ली ते 9 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप व 10 वी ते पदवी व पदव्युत्तर स्तरावर यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र फोल्डर फाईल व पेन देण्यात आले या उपक्रमात 200 पर्यंत विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विवेक जगताप, मनोज भांडारकर, सतीष पवार, चंद्रकांत जगताप, प्रशांत कापुरे, नथ्थु शिंपी, दिलीप सोनवणे, परेश जगताप, विकास जगताप, किरण सोनवणे, अरूण मेटकर, संजु बागुल, डिगंबर मेटकर, जगदीश मेटकर, दिलीप भामरे, जितेंद्र कापडणे, जितेंद्र शिंपी, दिनेश खैरनार, नरेश बाविस्कर, सुभाष भांडारकर, युदिश खैरनार, अनिल जगताप, उदय खैरनार, गणेश सोनवणे, विनोद बडगुजर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज भांडारकर तर आभार नथ्थु शिंपी यांनी केले. पालखी सोहळ्यानंतर झालेल्या महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला.