मुक्ताईनगर- श्री संत मुक्ताई शुगर अॅण्ड एनर्जी लि.घोडसगाव, मुक्ताईनगर येथे पाचव्या गळीत हंगामातील (2018-19) उत्पादीत एक लाख एक हजार 111 क्विंटल साखरेचे पूजन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते सोमवारी झाले. बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष विलास धायडे, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, राजू सवळे, चंद्रकांत भोलाने, विनोद गवळे, संदीप देशमुख, विश्वनाथ महाजन, रामभाऊ पाटील, प्रेमचंद बढे, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.
एफआरपीपेक्षा जास्त उसाला भाव -एकनाथराव खडसे
एकनाथराव खडसे म्हणाले की, शेतकर्यांनी उसाची लागवड केल्यामुळे कारखाना यशस्वी रीतीने पाचवा गळीत हंगाम पार पाडत आहे. कारखाना उसाला एफआरपीपेक्षा जास्त भाव देत आहे. चालुवर्षी कारखान्याने उसाला एक हजार 800 भाव दिला आहे आपण जर कारखाना लाभ क्षेत्रात ऊसाची जास्त लागवड केली तर वाहतूक खर्चात बचत होऊन ऊसाला आणखी अधिकचा भाव देणे शक्य होइल तेव्हा शेतकरी बांधवानी ऊस लागवडीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. स्थानिक संचालक विलास धायडे यांनी प्रास्ताविक केले. चालू गळीत हंगामात कारखान्याने आतापर्यंत एक लाख 22 हजार 330 मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून एक लाख एक हजार 111 क्विंटल साखर उत्पादित केली असून 9.02 चा साखर उतारा आहे. कारखान्याने वीज कंपनीला एकूण 39 हजार 49 हजार 200 युनिट विजेचा पुरवठा केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चीफ इंजीनियर तुकाराम सूरवसे, कृषी अधिकारी मुश्ताक पटेल, रसायन विभागाचे इंजीनियर के.व्ही.पाटील, गोपाळ पाटील, रवीकुमार भोसले, पंकज पाटील यांनी परीश्रम घेतले.