संत मुक्ताई साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ

0

मुक्ताईनगर- औद्योगिक विकासाला चालना देणार्‍या संत मुक्ताई शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लि. कारखान्याचा पाचवा गळीत हंगामाचा शुभारंभ 29 ऑक्टोबर रोजी होत आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या संत मुक्ताई शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लि.घोडसगाव या कारखान्याचा पाचवा गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे असतील. प्रसंगी पर्यटन व रोजगार हमी मंत्री
ना.जयकुमार रावल, सामाजिक न्याय व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या शुभहस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ कारखाना साईट येथे सोमवारी दुपारी एक वाजता पार पडणार आहे.

यांची राहणार उपस्थिती
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महानंदच्या अध्यक्षा मंदा खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, चैनसुख संचेती, खासदार .ए.टी.नाना पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार संजय कुटे, आमदार सुरेश भोळे, जळगाव जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील, बुलडाणा जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा उमा तायडे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान संयोजक डॉ.राजेंद्र फडके, अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष मोहम्मद हुसैन खान, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, जळगाव जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजीराव दिवेकर, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, नगराध्यक्षा नजमा इरफान तडवी, मुमताजबी बागवान, अनिता येवले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या गळीत हंगाम शुभारंभाला जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी उपस्थित रहावे, असे आवाहन चेअरमन शिवाजीराव जाधव, व्हा.चेअरमन अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी केले आहे.