संत मुक्ताबाई पालखी सोहळा : चिखलीत वारकरी भाविकांची आरोग्य तपासणी

0

मुक्ताईनगर- श्री क्षेत्र कोथळी येथून निघालेला श्री मुक्ताई पालखी सोहळा चिखली येथे मुक्कामी पोहोचल्यानंतर भाविकांनी स्वागत केले. ठिकठिकाणी पालखीचे रिमझीम पावसात स्वागत करण्यात आले. श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट, कोल्हापूर, चिखली मेडिकल असोसिएशन आणि भास्कर अर्बन बँक यांच्यातर्फे वारकर्‍यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ.दीपक खेडेकर, डॉ.चित्तरंजन रिंढे, डॉ.योगेश काळे, डॉ.शिवशंकर खेडेकर, डॉ.विष्णू खेडेकर, डॉ.विकास मगर, डॉ.अरुण कुटे, डॉ.सचिन खरात, डॉ.सचिन भराड, डॉ.पांढरी इंगळे, डॉ.विठ्ठल काळुसे, डॉ.भारत पाणगोळे, डॉ.निलेश गायकवाड आदींनी तपासणी करून औषधे दिली. दरम्यान, पालखी सोहळ्यात प्लॅस्टीकच्या वस्तू वापरणे काटेकोरपणे टाळले जात आहे.