मुक्ताईनगर : तालुक्यातील कर्की येथील राधागोविंद ज्ञानोदय विद्यालयात संत मुक्ताबाई महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे 21 ते 27 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी ज्ञानोदय मंडळाचे अध्यक्ष एस.ए. भोई तर उद्घाटन माजी सैनिक पांडूरंग सौंदळे यांच्या हस्ते होईल. या श्रमसंस्कार शिबिरात स्पर्धा परिक्षेबाबत जागरुकता, डिजिटलायझेशन, जातीमुक्त भारत, पर्यावरण संवर्धन, जादू टोणा विरोधी कायदा, अंधश्रध्दा निर्मूलन, सामाजिक प्रसार माध्यमांचा समाजावरील परिणाम, साहित्य आणि सामाजिक प्रसार माध्यमे या विषयांवर बौध्दिक सत्र घेण्यात येतील. तसेच जलसंधारण बंधारा, स्वच्छता अभियान हे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमास गटविकास अधिकारी डी.आर. लोखंडे, शशिकांत कुळकर्णी, शालेय समिती चेअरमन अनिल वाडिले, सचिन इंगळे, माजी सभापती रमेश पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.