भुसावळ । संत रोहिदास महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे संत रोहिदास यांची 641वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी आमदार संंजय सावकारे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष अविनाश सुरवाडे, सचिव आर.डी. बावस्कर, उपाध्यक्षा कुसुम सुरवाडे, नगरसेवक रमेश मकासरे, मनोहर अहिरे, सल्लागार पी.जी. सुरवाडे, सदाशिव सावकारे, प्रकाश डोळे, आर.पी. गौर, वासुदेव घुले, दिपक निंभोरे, विमल बावस्कर आदी समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.