संत शिरोमणी रविदासजी महाराज जयंती उत्साहात

नवापूर। शहरातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात संत शिरोमणी रविदासजी महाराज यांची 645 वी जयंती मोठ्या उत्साहात नवापूर चर्मकार समाजातर्फे साजरी करण्यात आली. सर्वप्रथम संत शिरोमणी रविदासजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्ज्वलन नगराध्यक्षा हेमलता पाटील, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेक सविता नगराळे, माजी नगरसेविका सुशिला अहिरे, प्रतिमा अहिरे, माजी नगरसेवक अजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी समाजाचे अध्यक्ष छोटु अहिरे, रतिलाल अहिरे, उखडु झांझरे, भगवान अहिरे, छोटु चव्हाण, तुकाराम अहिरे, नथ्थु अहिरे, मधु अहिरे, सदु अहिरे, लक्ष्मण चव्हाण, रवी पवार, विजय तिजविज, जितेंद्र अहिरे, रवींद्र बरखडे, मनोहर नगराळे, आनंद साळवे, योगेश साळवे, प्रदीप चौधरी, कचरु चव्हाण, पंकज अहिरे, महेंद्र अहिरे, योगेश चव्हाण, समस्त चर्मकार समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमात मजदुर सेनेचे जिल्हाध्यक्ष स्व.मनु बिर्‍हाडे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर उपस्थित मान्यवरांचा समाजाचे अध्यक्ष छोटु अहिरे, विजय तिजविज यांनी सत्कार केला. यावेळी संत रविदासजी महाराज यांच्याविषयी महेंद्र अहिरे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी नवापूर शहरातील समस्त चर्मकार समाज बांधवांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन जितेंद्र अहिरे तर रवी पवार यांनी आभार मानले.