संत शिल्पाच्या सुशोभित कमानीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन

0

या शिल्पामुळे नावलौकिक वाढण्यास होणार मदत- आमदार लांडगे

चिखली- चिखली गावाला संत तुकाराम महाराज यांच्या माध्यमातून विशेष महत्व आहे. त्यामुळे संत शिल्प या कमानीच्या माध्यमातून त्यामध्ये भर पडणार आहे. तसेच संतपीठाच्या माध्यमातूनही नावलौकीक वाढणार आहे, मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने प्रभाग क्रमांक एक, चिखली गावठाण येथे उभारण्यात आलेल्या संत शिल्पाचे सुशोभित प्रवेशद्वाराच्या कमानीचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर शैलजा मोरे, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, क्रीडा,कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती संजय नेवाळे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा नम्रता लोढे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, नगरसदस्य कुंदन गायकवाड, राहुल जाधव, नगरसदस्या साधना मळेकर, अश्‍विनी जाधव, संगिता ताम्हाणे, माजी नगरसदस्य शांताराम भालेकर, सुनील लोखंडे, सुरेश म्हेत्रे, स्वाती साने, प्रभाग समितीचे नामनिर्देशित सदस्य सागर हिंगणे, दिनेश यादव, संतोष मोरे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे आदी उपस्थित होते.

संत परंपरेचा वारसा जपणार
उद्घाटनप्रसंगी आमदार महेश लांडगे म्हणाले की, चिखली गावाला संत परंपरेचा खूप जुना वारसा आहे. तो वारसा जोपासण्याचा प्रयत्न पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. या भागामध्ये राहणार्‍या लोकांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच पोलीस ठाणे तयार करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. महापौर नितीन काळजे यांनी आपल्या भाषणात प्रवेशद्वार हे अतिशय उत्तम शिल्प बनले असून पालखी या मार्गावरून जात असताना या शिल्पामुळे चिखली गावाला शोभा येईल असा उल्लेख केला. तसेच यावेळी माजी नगरसदस्य सुरेश म्हेत्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसदस्य राहुल जाधव यांनी केले तर आभार नगरसदस्या साधना मळेकर यांनी मानले.