संत सावता नगरात विद्यूत रोहित्राचे उद्घाटन

0

आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नात यश

जळगाव । संत सावता नगर हा परिसर शहराचा वाढीव भाग असल्याने वीजेच्या कमी जास्त दाबाने सदर परिसरातील नागरिक त्रस्त होते. यामुळे सदर परिसरात खूप अंधार राहणे, रात्री अपरात्री ये-जा करण्यार्‍या पादचार्‍यांना साप विंचू यांचा खूप त्रासाला सामोरे जावे लागत होते. सदर भागात डी.पी.नसल्याने विद्युत उपकरण, फ्रीज, टीव्ही, लाईट, पंखे उपकरणे जळणे या अश्या त्रासाला नागरिक कंटाळले होते. वेळोवेळी परिसरातील नागरिकांनी मागणी करूनही डी.पी. (विद्युत रोहित्र) बसवून मिळत नव्हते. या जाचाला कंटाळून या नागरिकांनी आ.सुरेश भोळे (राजूमामा) यांची भेट घेतली असता आचारसंहिता संपल्यानंतर लागलीच डी.पी. (विद्युत रोहित्र) बसवून देण्यासाठी नागरिकांना शब्द दिला होता.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम
सोमवारी सकाळी 10 वाजता संत सावता नगरात आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांच्याहस्ते 10 लाख रुपये खर्च आलेल्या विद्यूत रोहित्राची फीत कापून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांचा नवनिर्वाचित नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील, महावितरणचे अधिकारी पी.एस. महाजन, वायरमन कर्मचारी यांनी सत्कार केला. प्रसंगी संत सावता नगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत पाटील यांनी केले तर आभार प्रतापसिंह परदेशी यांनी मानले. यशस्वीतेसाठी विशाल भावसार गोपाळ चौधरी, प्रमोद पाटील आदींनी परिश्रम घेतले.