संत सावता भूषण पुरस्कारासाठी प्रस्तावाचे आवाहन

0

नंदुरबार तळोदा। संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दिला जाणार्‍या राज्यस्तरीय संत सावता भूषणपुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, क्रीडा, सांस्कृतिक वैद्यकीय, क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या व्यक्तींना दरवर्षी ’संत सावता भुषण’ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.या वर्षासाठी देण्यात येणार्‍या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रस्तावात उमेदवाराचे परिचय पत्र,चार रंगीत फोटो,दोन मान्यवर व्यक्तीचे शिफारस पत्र,आपण केलेल्या कामगिरी बद्दलची कात्रणे, इ.पोस्टाने 31 ऑगष्ट पर्यंत सुनील गुलदगड, संत सावता महाजन मंदिरा शेजारी , भगवा चौक, ता.राहुरी जि. अहमदनगर 41375 या पत्त्यावर पाठवावे असे संघाचे प्रसिद्धि प्रमुख प्रवीण महाजन यांनी कळविले आहे.