भडगाव । संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमानीं साजरी करण्यात आली. सावता महाराज मढी येथून प्रतिमेची रथमार्ग मिरवणूकी काढण्यात आली. यानंतर लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालयात दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीचें गुणगौरव सोहळा झाला. यावेळी भडगाव पोनि दत्तात्रय परदेशी, नायब तहसीलदार मुकेश हिवाळे, सपोनि रविंद्र जाधव, श्री. पठारे, समाजाध्यक्ष भिकन महाजन, नगरसेविका वैशाली महाजन, मुख्याध्यापीका भारती रामकौर व लतिका वाघ हे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. नायब तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी मनोगतातुन सांगितले की, समाजाने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक, प्रगती पुढे वाटचाल करून सर्वानी समाज हित जोपासावे. गुणवंत विद्यार्थानीं यापुढे स्पर्धा परीक्षांचे मार्ग अवलंबून समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे यावेळी गुणवंत विद्यार्थीना संबोधुन केले.
मान्यवरांसह समाज बांधवांची उपस्थिती
निंबा महाजन, साहेबराव महाजन, शिवदास महाजन, संतोष महाजन, प्रदीप महाजन, विनोद महाजन, मनोज महाजन, गणेश महाजन, जिल्हाध्यक्ष देवराम महाजन, रमेश महाजन, दिनेश महाजन, अशोक महाजन, जिवन महाजन, संजय महाजन, रावसाहेब महाजन, गोरख महाजन, पप्पू चौधरी, गोकुळ महाजन, सागर महाजन, प्रकाश महाजन, संदीप बोरसे, नगरसेवक सचिन चोरडीया, अतुल पाटील, वसीम मिर्झा, सुभाष पाटील, भैय्यासाहेब पाटील, गणेश परदेशी, रवी अहिरे आदी मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विलास महाजन यांनी केले तर आभार प्रविण महाजन यांनी मानले.
आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते अभिवादन
अमळनेर । श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करतांना माननीय आमदार शिरीष चौधरी, प्रा. अशोक पवार, सुरेश सोनवणे, पंडित चौधरी, सुनील भामरे, योगराज सदांनशिव, आरिफ भाया, दिलीप पाटील, दिनेश माळी, बाळासाहेब महाजन, एच टी माळी, प्रवीण महाजन, महेश माळी, रामचंद माळी, नगराज माळी, पंढरीनाथ महाजन, अमोल माळी, गोकुळ बागुल, गणेश माळी, विजय माळी, समाज पंच मंडळ व महिला उपस्थीत होते.
शेंदुर्णी येथे माळी समाजातर्फे कार्यक्रम
शेंदुर्णी । प्रतिनिधी येथील संत सावता महाराज विकास मंडळ व माळी समाज बांधवांतर्फे शनिवार 22 जुलै 17 रोजी संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने संत कडोबा महाराज मंदिरात सकाळी संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे भिका माळी यांच्याहस्ते सपत्नीक पूजन व आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारी 12 वाजता येथीलच दत्त मंदिरात माळी समाजाचे वतीने अन्नदान करण्यात आले तसेच रात्री हभप सुभाष महाराज (भालोदकर) यांचे सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी हभप कडोबा महाराज माळी, त्र्यंबक माळी, रघुनाथ माळी, हरीभाऊ माळी, हिरा माळी, भिका माळी, नथ्थु माळी तसेच शेंदुर्णी येथील वारकरी संप्रदाय मंडळी, महिला भजनी मंडळी उपस्थित होते.