संत सावता महाराज पुण्यतिथी कार्यक्रम उत्साहात

0

नवापुर । महाराष्ट्र माळी महासंघ शाखा नवापूरच्यावतीने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या एकशे बावीसावी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. ए. बी. महाजन होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून जी टी पाटील महाविद्यालयातील प्रा. डॉ. माधव कदम उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिगंबर सूर्यवंशी, प्रा. डॉ. नितीनकुमार माळी,प्रा. मुरलीधर उदावंत, थेटे काका, किशोर रायते, ज्ञानेश्वर पुराणिक उपस्थित होते. संत सावता महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. डॉ. माधव कदम यांनी संत सावता चरित्र निरूपण केले. अध्यक्षीय समारोपातून ए बी महाजन यांनी सावतांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांची विज्ञानदृष्टी घेऊन समाज हित साधण्याचे आवाहन केले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
याप्रसंगी नम्रता बोरसे, सुराज जाधव, आदिती पुराणिक, हितेश माळी, हर्षदा माळी, रोहित रायते, वैष्णवी माळी, विवेक रायते, कौतुभ नहिरे, मयूर रायते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सुत्रसंचलन प्रा मनोज पगारे, प्रास्ताविक प्रा. डॉ. नितीनकुमार माळी, परिचय गणेश महाजन यांनी तर आभार ज्ञानेश्वर पुराणिक यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी यू माळी, प्रवीण नवरे, उत्तमराव महाजन, सतीश रायते, कल्पेश थेटे, नितीन महाजन, चंद्रकांत फराटे, डॉ. चेतन घरटे, राजधर जाधव, कैलास माळी, प्रा.डॉ श्रीकांत महाजन, प्रा.डॉ एस डी पाटील प्रकाश बाविस्कर, योगेश महाले यांनी परिश्रम घेतले.