भुसावळ । संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर व परिसरातील विविध सामाजिक संस्था व संघटनांतर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. तर काही संघटनांतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शोभायात्रा काढण्यात येऊन कार्यक्रम घेण्यात आले.
यावल येथे गुणवंतांचा सत्कार
येथे श्री संत सावता माळी महाराज पुण्यतिथीनिमित्त माळी समाजातर्फे व्यास मंदिर हॉल येथे गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धुळे येथील उद्योगपती तावडीया, मुबंई येथील केदार, यावल शहराचे उपनगराध्यक्ष मुकेश येवले, नगरसेवक सुधाकर धनगर, नाशिक येथील पी.आय. महाजन आदी उपस्थित होते. तसेच मुकेश येवले यांनी समाज कसा एकत्रित राहील, या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश महाजन, नारायण महाजन, बाळू माळी, सुभाष महाजन, संजय पाटील, सुनील वारुळे, संतोष महाजन, रवी माळी, नितीन माळी, गुड्डू माळी, चंद्रकांत माळी, देशमुख, माळी, किशोर माळी (गोलु) आदींनी परिश्रम घेतले.
भुसावळात प्रतिमापूजन
नामदेव महाराज तसेच संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे प्रतिमा पूजन करुन आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी रघुनाथ सोनवणे, जे.बी. कोटेचा यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सभेत प्रमोद पाटील, गोविंदा पाटील, विनोद शर्मा, राजू गुरव, प्रशांत वैष्णव, अनिल ठाकुर, चंद्रसिंग चौधरी, उमेश कळमकर, अंबादास काळे, दत्तु कासोदेकर, संतोष चिनावलकर, विनोद वाघे, मंगेश शिंदे, किशोर भादलीकर, बाळु अडावदकर, मधुकर पारसे आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते देखील प्रतिमा पूजन करण्यात आले.