रामकृष्ण लहावितकर अध्यक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने आयोजित 7 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनात विशेष अतिथी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केलेले भाषण जसेच्या तसे. संमेलनाध्यक्ष हभप डॉ. रामकृष्ण महाराज लहावितकर, स्वागताध्यक्ष पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार सर्वश्री डॉ. परिणय फुके, आमदार संजय पुराम, विजय रहांगडाले, समाजकल्याणचे सचिव दिनेश वाघमारे, समाज कल्याणचे आयुक्त मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, माजी आमदार हेमंत पटले, सप्त खंजिरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज, बाबा महाराज राशनकर, माधव महाराज शिवनीकर, प्रशांत महाराज ठाकरे, महादेवबुवा शहाबाजकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आज समाजातील वाईट प्रथांवर वार करण्याचे आणि प्रत्येक वाईट गोष्टीविरोधात उभे करण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले आहे, याच संत साहित्याने समतेचा संस्कार करून समाजाचे आत्मबळ जागे करण्याचे काम केले आहे. संत हे कर्माने व ज्ञानाने मोठे झाले. त्यामुळे समाजातील सर्व लोक या संतांपुढे नतमस्तक होतात. 11 ते 17 व्या शतकापर्यंत आपल्या संस्कृतीवर आक्रमण होत होते, हे आक्रमण परतवून लावण्याचे काम वारकरी संतांनी केले. वारकरी संप्रदायामध्ये अंधश्रद्धेला थारा नाही. लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम संतांनी केले. संतांनी विश्वाची, जनतेची चिंता केली. ते कधीच आत्मकेंद्रित नव्हते. हे विश्व माझे घर आहे हा विचार वारकरी संप्रदायाने मांडला. वारकरी संप्रदाय हे जगातील अद्वितीय संघटन आहे. अत्यंत शिस्तीत ते पंढरीच्या वारीला जातात. आपली संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम वारकरी संप्रदाय करीत आहे. संतांचे साहित्य समाजापर्यंत पोहोचले तर समाजातील व्याधी दूर होतील. तुकोबा, ज्ञानोबा यांच्या लिखाणातून मिळणार्या ज्ञानामुळे मनशांती लाभेल. आज शेतकर्यांवर अरीष्ठ आले आहे. वातावरणातील बदलामुळे हे होत आहे. वनांचे, जंगलांचे, तलावांचे नुकसान आपण केले, तर निसर्ग हा आपल्यावर कोपतो. मानवाने निसर्गाची काळजी घेतली नाही, त्यामुळेच ही नैसर्गिक संकटे ओढावतात असे त्यांनी सांगितले. यावर्षी जिल्ह्यात दुष्काळाच्या स्थितीमुळे रब्बीच्या हंगामात शेतकर्यांना धानाची रोवणी करता आली नाही. शेती शाश्वत करताना निसर्गाचा समतोल राखून करावी, त्यामुळे अडचण येणार नाही. जिल्ह्यातील 42 हजार शेतकर्यांच्या खात्यात कर्जमाफीचा पैसा जमा करण्यात आला आहे.
इथला शेतकरी संकटाचा सामना करतो, आत्महत्या करत नाही. या जिल्ह्यातील रोहयोच्या कामावरील 1 लाख मजुरांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांसाठी मदत म्हणून प्रत्येकी एक रुपया दिला आहे. जिल्ह्यात राईस पार्कला मान्यता देण्यात येईल. त्यामुळे धान संशोधनास व शेतकर्यांना मदत होईल. शेतकर्यांच्या उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा धरून शेतकर्याला हमीभाव देण्याचा निर्णय प्रधानमंत्र्यांनी घेतला आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना मदत करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता केंद्रातून गरजू व्यक्तींच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करण्यात येत आहे. त्यामुळे गरीब व गरजू व्यक्तींच्या शस्त्रक्रिया मोफत करता येणे शक्य होईल. केंद्रीय अर्थसंकल्पातील आरोग्य योजनेमुळे देशातील 50 कोटी लोकांना उपचार व शस्त्रक्रियेसाठी 5 लाख रुपयापर्यंतची मदत मिळणार आहे. सत्यपाल महाराज यांच्या कार्याचा मी गौरव करतो. सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनामुळे हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्यास मदत झाली आहे. संत चोखोबांच्या मंगळवेढा या निर्वाणभूमीत त्यांचे चांगले स्मारक उभारण्यात येईल. जिल्ह्यातील वर्ग-2 च्या जमिनी वर्ग-1 मध्ये करण्यास जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. देशातील धानाच्या विविध जातींच्या वाणावर सखोल संशोधन करून बदलत्या नैसर्गिक वातारणात टिकाव धरून मानवासाठी आवश्यक मूलभूत अन्नतत्त्वे मोठ्याप्रमाणात उत्पादित करणार्या नवीन वाणांचा विकास करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात राज्यातील पहिला राईस पार्क सुरू करण्यात येईल. राईस पार्कच्या माध्यमातून धानाच्या संशोधनाला मोठी प्रेरणा मिळेल. अलीकडेच भंडारा जिल्ह्यात राईस क्लस्टर देण्याचा निर्णय झाला. आता गोंदिया जिल्ह्यात राईस पार्क देण्याचा निर्णय आजच जाहीर करत आहे. धानाला उचित दाम मिळवून देण्यासाठीही शासन कटिबद्ध आहे. गोंदियासारख्या अतिदुर्गम भागातील शेतकरी अवर्षण, तुडतुडा, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने त्रस्त असला तरीही तो आत्महत्या करत नाही, कारण त्यांच्यावर संतांचे संस्कार आहेत. गोंदियातील शेतकर्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्यांसाठी दिलेला मदतीचा हात हेच संतांचे कार्य आहे.
वारकरी फेटा, घोंगडीप्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सुरू केलेला पहिला संत चोखामेळा पुरस्कार सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराज यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे मंचावर आगमन होताच वारकरी फेटा, घोंगडी व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.